नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी छातीत दुखत असल्याने दिल्ली येथील आर अँड आर आर्मी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तेथे दाखल झाल्यानंतर सर्वात आधी त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले.
हॉस्पिटलच्या हेल्थ बुलेटीनच्या माहितीनुसार, रामनाथ कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मुलीला सोबत घेत दिल्ली येथील आर्मी हॉस्पीटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस 3 मार्च रोजी घेतला होता.
यानंतर राष्ट्रपतीनी देशात यशस्वीरित्या लसीकरणाचा अभियान चालवणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले होते आणि इतर लोकांना लस घेण्याचे आवाहन केले होते.






