विक्रोळीत लसीकरण स्टॉलवरुन भाजप विरुद्ध शिवसेना वादंग

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – विक्रोळी येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कोविड’ लसीकरण केंद्रा’बाहेर भाजपने कोरोना लसीकरणासाठी लावलेला ‘स्टॉल’ हटवण्याची सूचना प्रशासनाने दिल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

भाजपतर्फे विक्रोळीतील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कोविड’ लसीकरण केंद्रा’बाहेर लसीकरण नोंदणी मोहीम राबवण्यात येत होती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर करणे, रुग्णालय प्रशासन आणि सामान्य माणसांमध्ये दुवा साधण्याचे काम भाजपने केले. पण, गुरुवारी अचानक शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत, नगरसेविका करंजीकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी आले. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी भाजप पदाधिकार्‍यांना रुग्णालयाच्या आवारातून ‘स्टॉल’ काढायला लावला.

रुग्णालय प्रशासनावर कुणी दबाव आणला का? असा सवाल भाजपच्या पदाधिकारी आणि जनतेला पडला आहे, ज्यामुळे आम्हाला आमची लसीकरणाची मोहीम थांबवावी लागल्याची प्रतिक्रिया समाजसेविका श्रुती घोगले आणि विक्रोळी विधानसभा युवतीप्रमुख तृषाली भास्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here