ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या विधानावरून देखील टोला लगावला आहे.
भातखळकर म्हणाले, “शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?’ मॉलमधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत.
‘शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?’
मॉल मधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत. pic.twitter.com/BXk8I1jUSE— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 26, 2021
पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा अनधिकृत सनराईझ हॉस्पिटलशी थेट संबंध असून त्याच्यामुळेच शिवसेनेने या हॉस्पिटलला ओसी नसताना मंजूरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला आहे.” असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.






