मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने सम्पूर्ण राज्यात रविवार २८ मार्च रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिविल सर्जन यांच्याशी बोलताना कोविड स्थिती याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेताना मुख्यमंनत्र्यांनी रात्रीची जमावबंदी लावण्याचे आदेश दिले. यातून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लोकडावूनचे संकेतही त्यांनी दिले.






