वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लातूरमध्ये हरणाच्या पाडसाचा मृत्यू

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – लातूरमध्ये पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल हरणाचे पाडस खुर्शीद शेख यांच्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. अवघ्या काही महिन्याचे पाडस गुरूवारी पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना विहिरीत पडल्यानंतर ते जिवंत असताना गावातील काही युवकांनी वन विभागाच्या विजयकुमार नेकनाळे अधिकाऱ्यांना फोनवरून ही माहिती देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले परंतु या कर्मचाऱ्यांनी याला काही होत नाही असे सांगून उद्या त्याला आपण बाहेर काढू असे सांगून ते परत गेले व रात्रभर ते पाडस तसेच विहिरीत राहिले व त्याचा मृत्यू झाला. वेळीच बाहेर काढले असते तर हे हरणाचे पाडस जिवंत राहिले असते असे गावातील युवकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here