यूट्युब पाहून बनवल्या बनावट नोटा; खेरवाडी पोलिसांनी मारला छापा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – वाकोला परिसरातील बनावट नोटांचा कारखाना खेरवाडी पोलिसांनी उद्ध्वस्त केला. बनावट नोटा बनवणाऱ्या पदमसी छाडवाला याला खेरवाडी पोलिसांनी अटक करून 1 लाख 35 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

लॉकडाऊन काळात घरखर्च त्यानंतर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने बनावट नोटा बनवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सांताक्रुझच्या हंस भुग्रा परिसरात एक जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली. परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास आव्हाड मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पथकाने हंस भुग्रा परिसरात सापळा रचून पदमसीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here