दापोलीत महिला पोस्टमास्तरची आत्महत्या

दापोली (प्रतिनिधी) – तालुक्यातील मुरूड पोस्ट ऑफिसमधील महिला पोस्टमास्तर पूर्वी तुरे वयांनी गळफास घेवून आत्महत्या केली.

पूर्वी तुरे (30) या गेल्या वर्षभरापासून मुरुड पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होत्या.त्यी नेहमी प्रमाणे सकाळी ऑफिसला गेल्या होत्या. दररोज 6 वाजता घरी येत असत.शनिवारी मात्र 7 वाजून गेले तरी घरी न आल्याने घरच्यांचा शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पूर्वी तुरे यांनी ऑफिसमध्ये पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. आज शुक्रवारी दुपारच्या सत्रात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

या घटनेची खबर मिळताच दापोली पोलीसांनी पंचनामा केला व रात्री 2 वाजता पुर्वी तुरे यांचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. मात्र शवविच्छेदन करण्याकामी उशीर करण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here