अनैतिक संबंधांतून हमालाचा दगडाने डोके ठेचून खून

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी एका हमालाचा अनैतिक संबंधाच्या वादातून खून करण्यात आला आहे तर शुक्रवारी संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली. नितीन नागनाथ उबाळे (रा. भीमनगर, शेळगी) व महेश संगप्पा कुंभार अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

नितीन उबाळे हा हमालीचा व्यवसाय करत होता. याच परिसरातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद सुरू होता. यातूनच नितीन उबाळे याला घरातून बोलावून घेऊन शेळगीतील नागोबा मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून ठार करण्यात आले. पोलिसांनी विशाल मोहन सुरवसे याला ताब्यात घेतले आहे.

दुसरी घटना कुमठानाका परिसरात म्हेत्रेनगरमध्ये घडली आहे. भीमराव कुंभार व महेश कुंभार यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. भिमराव त्याची पत्नी गीता व मित्र संजय बनसोडे या तिघांनी महेशच्या घरी जाऊन वाद सुरू केला. या वादातून महेश याच्यावर वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here