अंबरनाथ आयटीआय परिसरात केमिकलच्या टाकीत तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – केमिकलची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या तीन कामगारांचा उग्र वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्घटना आयटीआय परिसरात असलेल्या इंडस्ट्रीयल इस्टर्न अॅण्ड केमिकल कंपनीत घडली. चौथा कामगार धडपड करत टाकीबाहेर आल्याने त्याचा जीव बचावला.

इंडस्ट्रीयल इस्टर्न अॅण्ड केमिकल कंपनीत वेस्ट ऑईलवर प्रक्रिया करून त्याचे रिसायकलिंग केले जाते. तेलांमधील थर टाक्यांमध्ये साठवला जातो. ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून बंद असून आज सकाळपासूनच तिच्या साफसफाई आणि नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी गोवंडी येथून चार रंग कामगार आणण्यात आले होते.

कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलची भूमिगत टाकी स्वच्छ करण्यासाठी हे कामगार उतरले. मात्र उग्र दर्पामुळे चौघेही गुदमरले. त्यातील एक कामगार कसाबसा टाकीबाहेर आला. मात्र इतर तिघे टाकीतच बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, हे तिघेही कामगार मुळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना या कामासाठी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेचे साहित्य पुरवण्यात आले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here