अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या विकेण्ड लॉकडाऊनसाठी कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७ पासुन सर्व दुकाने,बाजार पेठ,बंद करण्यात आल्या, शनिवार व रविवारी सर्व दुकाने बंद करण्यात आली. फक्त अत्यावश्यक किराणा दुकान, दूध उत्पादन,मेडिकल,हॉस्पिटल, वगळता बाकीचे सर्व दुकाने बंद करण्यात आले.तसेच आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे.
मैंदर्गी नगरपालिकेकडुन दिनांक २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता २६ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता दवंडी मारण्यात आली होती, त्या दवंडीनुसार नागरिकांनी नियमाचा पालन केले व त्यानुसार कोणी बाहेर सुद्धा फिरले नाहीत.मैंदर्गी चौक परिसरात खूप मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत होते,पण विकेण्ड लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एकही व्यक्ती फिरताना दिसेना,बाजारलाईन सुद्धा सामसुम होती. मैंदर्गीचे आजूबाजूचे सर्व ढाबे बंद केले.कोरोना रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरीकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






