श्रीनगर – काश्मीरच्या उत्तरेतील बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयावर हल्ला केला. यात एक पोलीस शहीद झाला. तर एक काउन्सिलर ठार झाला. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. यात एक पोलीस शहीद झाला असून एक काउन्सिलर ठार झाला. आणि काहीजण या घटनेत गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोपोरमधील हल्ल्यात नगरपरिषदेचा एक काउन्सिलर ठार तर एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाला. या घटनेत जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येत लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफचे जवान दाखल झाले आहेत.
सोपोरमधील हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात हाय अॅलर्ट दिला आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सकडून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. सर्व रस्त्यांची नाकाबंदील करण्यात आली आहे.






