पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या; ४७ लाखांच्या मुद्देमालासह वाहने जप्त

वाळू माफियां

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी तब्बल ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, वाळू तस्करांमध्ये यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोषी वाहन चालक, मालक आणि वाळू साठा करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेगाव दुमला आणि आंबे गाव परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी वाळू उपशाची साधने, वाहने आणि मोठा वाळू साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी शेगाव दुमला गाव: वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी, एक टेम्पो आणि एक ट्रॅक्टर (एकूण किंमत: ११ लाख ५० हजार रुपये), आंबे गाव (वाळू साठा): बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली १२५ ब्रास वाळू (किंमत: ७ लाख ५० हजार रुपये), आंबे गाव (वाहतूक): वाळूची अवैध वाहतूक करणारे एक टिप्पर (किंमत: २८ लाख रुपये) आणि त्यातील ५ ब्रास वाळू (किंमत: ३० हजार रुपये) असा एकूण २८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

१ टिप्पर, १ इंट्रा टेम्पो, १ ट्रॅक्टर, यारी आणि १३० ब्रास वाळू असा एकूण ४७ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या वाहनांचे चालक, मालक आणि वाळू साठा करणाऱ्या आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली.

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ज्या धडाकेबाज पथकाने ही कामगिरी केली, त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, दत्तात्रय तोंडले, विक्रम वडणे, एएसआय आबा शेंडगे, पोलीस हवालदार सुहास देशमुख, दीपक रोकडे, मंगेश रोकडे, अभिमन्यू गरड, श्री. भोसले, सचिन गावडे, सागर गवळी, रामभाऊ चाटे, हसन नदाफ आणि श्री. गोडसे.

तालुक्यातील एकाही अवैध वाळू उपसा केंद्राला किंवा तस्कराला सोडले जाणार नाही. बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here