मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात) उपचार सुरू आहेत. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही संशय मनात न ठेवता सर्वांनी लस घ्यावी असे आवाहनही कदम यांनी केले होते.
रामदास कदम यांना करोनाची लक्षणे दिसल्यानंतर केलेल्या चाचणीत ते करोना पॉझिटीव्ह आढळले. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
कदम यांनी काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनतेला करोना लशीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी एक ट्विट देखील केले होते. कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती ! 1/2 pic.twitter.com/v6I3h2KJWG
— Ramdas Kadam – रामदास कदम (@iramdaskadam) March 22, 2021
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुवणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही कदम यांनी लोकांना केले होते.






