- आज एकूण 33 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले
- ग्रामीण भागात जोर पकडतोय कोरोना
चोपडा (संदीप ओली) – मंगळवारी (दि.२१) घेण्यात आलेल्या 90 रॕपिड टेस्टचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी 73 निगेटिव्ह तर 17 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.व स्वॕब द्वारे घेण्यात आलेल्या 51 अहवालापैकी 16 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.असे एकूण 141 प्राप्त अहवालापैकी 33 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यात ग्रामीण भागातील 24 व शहरातील 9 रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांमधे वर्डी येथील 40,45,29,21,60,39,42 वर्षाचे पुरुष व 15 वर्षाचा मुलगा तसेच 75,70,40,38,38 वर्षाच्या महिला असे एकूण 13, चुंचाळे येथील 43,40,व 23 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरुष असे 4,लासुर येथील 60 वर्षीय महिला,अडावद येथील 56 वर्षीय पुरुष व 16 वर्षीय मुलगी असे 2,वटार येथील 31 वर्षीय महिला,विचखेडा येथील 42 वर्षीय पुरुष,धनवाडी येथील 40 वर्षीय पुरुष,सनफूले येथील 37 वर्षीय पुरुषअसे एकूण ग्रामीण भागात 24 रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत.
तसेच शहरी भागातील सुदर्शन नगर येथील 58 व 67 वर्षीय पुरुष असे 2,बजरंग नगर येथील 47 वर्षीय पुरुष,सुंदरगढी येथील 65 वर्षीय महिला,सानेगुरुजी नगर येथील 32 वर्षीय पुरुष,श्रीराम नगर येथील 24 वर्षीय पुरुष,बारीवाडा येथील 65 वर्षीय पुरुष,परदेशी गल्लीतील 60 वर्षीय पुरुष व पाटिलगढीतील 54 वर्षीय महिला असे शहरी भागातील एकूण पॉजिटिव्ह रुग्ण 9 आहेत.
अशाप्रकारे चोपडा तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा 600 पर्यंत पोहोचला आहे.त्यामधे 402 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . 28 मृत झालेले आहेत.व 171 रुग्ण उपचार घेत आहेत.यामधे एक कोरोनाबाधित रुग्ण यावल येथील आहे.अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांनी दिली आहे.







