प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू

अमृतसर (पंजाब) – पंजाबी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय गायक दिलजानचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे 2 ते 3 च्या सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दिलजान अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला असून दिलजानचा अपघात कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा तपास पोलीस करत आहेत. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.sukhvinder-tweet

गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. आज सकाळी अतिशय दु:खद बातमी मला कळाली. संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. दिलजानचे निधन झाले, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

Punjabi-singer-Diljaan-Singh-killed-in-road-accident

दरम्यान, दिलजानने आजवर अनेक गाणी गायिली असून त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याने आधा पिंड, यारां दी गल, शूं करके, हर पल, फर्स्ट लव, मेरा दिल, धरती, तेरे शहर ही गाणी गायिली आहेत. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते. या गाण्याचे नाव ‘तेरे वरगे 2’ असे आहे. गाण्याबाबत दिलजान अतिशय उत्सुक होता. 2 एप्रिल रोजी त्याचे हे गाणे रिलीज होणार होते. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचे निधन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here