मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकापासून ते आमदार, खासदारांसह मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की करोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा. असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.
My Rapid Antigen test says that I am COVID positive. I request everyone who came in contact with me to get themselves tested.
I request everyone to follow COVID protocols & stay safe. 🙏
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
तसेच, माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना देखील करोनाची बाधा झाली आहे. रामदास कदम यांनीची आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.






