राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

नवी दिल्ली – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मंगळवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया केली आहे . मी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो. ‘एम्सच्या संचालकांशी संवाद साधून मी राष्ट्रपतींच्या आरोग्याची चौकशी केली. आता त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो’, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी छातीत दुखू लागल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आर्मी रुग्णालयात गेले होते. ज्यानंतर ठरल्याप्रमाणं त्यांनी बायपास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर शनिवारीच राष्ट्रपती कोविंद यांना ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) दिल्ली येथे दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here