पोलिसांना कायद्याचे लगाम राहिले नाही; पोलिसांना घोड्यासारखे लगाम लावण्याची गरज
बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – वैजापूर येथील बसस्थानक वरील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेता दीपक बरकसे यांना वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश काळे याने अश्लील भाषा वापरून त्यांचा अपमान केल्यामुळे या घटनेचा निषेध संपूर्ण जिल्ह्यातून व तालुक्यातून होत असून संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश खेडे याच्यावर पत्रकार कायदा एकोणतीस (29)अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करून ह्या मस्तीत आलेल्या निलेश केलेला निलंबित करण्यात येऊन त्याची हक्कल पट्टी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जराड यांच्या आदेशानुसार व जिल्हा अध्यक्ष सुनील वैद्य साहेब तसेच तालुका उपाध्यक्ष वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने एका निवेदनाद्वारे खुलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की वैजापूर येथील वृत्तपत्र वितरक तथा पत्रकार दीपक बर कसे तसेच पुसद येथील पत्रकात सय्यद आसिफ खंडाळा ठाण्याचा जमादार अर्जुन राठोड याचा बक्कल नंबर( 275) याने अपमानास्पद वागणूक देऊन फटका मारून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. कायदा आपल्या हातात असल्याची गुर्मी असलेल्या या लबाड लांडग्यांना घोड्याची लगाम घालण्याचे आवश्यकता आहे
सध्या एकीकडे कोरोना महामारीने थैमान मांडले आहे यामध्ये पोलिसांची फार महत्त्वाची भूमिका आहे स्वतः जीव मुठीत धरून काम करत आहे त्याच प्रमाणे पत्रकारहीहा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारांना कोणतेही संरक्षण नसताना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात घडणाऱ्या घटना शैक्षणिक सामाजिक आर्थिक अन्याय-अत्याचार तसेच विविध प्रकारचे बेकायदेशीर चालणारे अवैध धंदे या सर्व बाबी प्रसिद्धीच्या माध्यमातून पत्रकार जनतेसाठी प्रसिद्ध करतात यामुळे पत्रकार म्हणजे अनेकांची डोकेदुखी असतो. जनसामान्यांची मने दुखावतात म्हणून याचा फायदा घेऊन उद्योजक . ठेकेदार. शासकीय-निमशासकीय .अधिकारी विशेष म्हणजे पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक .पोलीस उपनिरीक्षक पोलीस . पोलीस हवालदार .पोलिस जमादार. खाजगी पोलीस .पत्रकारावर राग व्यक्त करतात किंवा खोट्या तक्रारी करून गुन्हा नोंदवण्याची धमक्या देतात
या उर्मट कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व गृहमंत्रालयाकडून तात्काळ कारवाई करून पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारावर ॲट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल होत असून हे तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा या विरोधात पत्रकार संघाकडून मोर्चा काढण्यात येईल. यावेळी पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत शिरसाट गल्लेबोरगाव ऑफर पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नवीन शहा तालुका प्रतिनिधी मुनीर शहा बाजार सावंगी हुसेन शेख अजिनाथ बारगड नवीन शहा सलमान खान उद्दीन शेख सरिफुद्दिन अति पत्रकारांची उपस्थिती होती.






