उद्योजक सुभाष सातपुते यांचे दातृत्व आदर्शवत- तहसीलदार विजय तळेकर .

आटपाडी (प्रतिनिधी) – उद्योजक सुभाष सातपुते यांचे दातृत्व आदर्शवत असल्याचे उदगार पनवेलचे तहसीलदार श्री . विजय तळेकर यांनी काढले. सुभाष सातपुते अँड कंपनीच्या वतीने 1 लाख रुपये किंमतीचा BLUE STAR ह्या नामांकीत कंपनीचा RO सहित वॉटर फिल्टर भेट म्हणून पनवेल तहसील कार्यालयास दिला . त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री . विजय तळेकर यांनी सुभाष सातपुतें चे कौतूक केले .

निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे उष्णतेचे प्रमाण खुप वाढायला लागल्याच्या स्थितीत पनवेल तहसील कार्यालयात विविध कामानिमित्त अनेक लोक येत असतात … त्यांना थंड पाण्याची पिण्याची सोय व्हावी या ऊद्देशाने सुभाष सातपुते अँड कंपनीच्या वतीने RO सहित वॉटर फ़िल्टर भेट म्हणून पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आला . या वॉटर फिल्टरचा फायदा सर्व नागरिकांना होणार आहे..

यावेळी तहसीलदार विजय तळेकर म्हणाले, समाजात अनेक श्रीमंत लोक आहेत पण सर्वच जण दातृत्वाच्या भावनेतून पुढे येतील असे नाही . परंतु, गेल्या वर्षभरात कोरोना काळात उद्योजक सुभाष सातपुते यांनी केलेली भरीव मदत पाहता त्यांच्यातील दातृत्व आवर्जुन नजरेत येते…आणि अशा सामाजिक कार्याचा आम्हांला कौतुक व अभिमान वाटतो. सुभाष सातपुते अँड कंपनीच्या वतीने हे मशीन भेट दिल्याचे कळताच प्रांताधिकारी नवले साहेब व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी सातपुते यांच्या मानवतावादी भूमिकेचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यानिमित्ताने माणदेशी उद्योजक सुभाष सातपुते यांनी, आटपाड़ी आणि माण तालुक्यातील 200 युवकांना आपल्या वाढदिवसा निमित्त MPSC / UPSC चे सेट भेट देणार असल्याची घोषणा केली .सुभाष सातपुते यांचा वाढदिवस 17 मे ला असतो…त्या निमित्त माण व आटपाड़ी तालुक्यातील गरीब व होतकरू 200 युवकांना सिडको अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र कुलकर्णी,सोलापुर महानगरपालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर , सिडको चे करण शिंदे, पॅराडाईज ग्रुपचे चेअरमन मनीष भतिजा, एमएमआरडीए मुंबईचे आदर्श मुख्य अभियंता मधुकर खरात,आयकर अतिरिक्त आयुक्त डॉ.नितीन वाघमोडे, आयकर सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मोटे साहेब,उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील व श्रीपती मोरे, आटपाडी तहसीलदार सचिन मुळीक व निवृत्त कार्यकारी अभियंता पोपटराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने सदरचे 200 संचाचे वाटप करण्यात येणार आहेत..तरी इच्छुक परिक्षार्थीं, युवकांनी 9970178963 नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सुभाष सातपूते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here