जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील लांडगे गल्ली परिसरात प्रभाग क्रमांक 7 मध्ये नुकताच पेव्हर ब्लॉक बसण्याच्या शुभारंभ माजी नगरसेवक श्री प्रकाश चिंधु पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
धरणगाव येथील प्रभाग क्रमांक 7 हा लांडगे गल्ली परिसर असून रस्ता अति खराब झालेला होता नागरिकांनी व महिलांना येण्या-जाण्यासाठी त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी तात्काळ त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करून पेव्हर ब्लॉक बसवून दिले.
सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नगरसेविका सौ आराधना नंदकिशोर पाटील,नंदकिशोर पाटील,शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,परीट समाजाचे अध्यक्ष छोटूभाऊ जाधव,बुलंद पोलीस टाइम्स जळगाव जिल्हा पत्रकार योगेश पी.पाटील,शिवसेना शाखा प्रमुख नगराज पाटील,पत्रकार सतीष बोरसे,कमलेश बोरसे,भगवान पवार,परेश नाईक,प्रमोद जोशी,दिनेश देशमुख,कुणाल चौधरी आदी उपस्थित होते.






