डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचं निधन

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवार (२९ मार्च) रोजी सकाळी १० वाजता निधन पावले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत सापडले होते

डहाणू नगर परिषद येथे दुसऱ्यांदा मुख्याधिकारी पदाचा पदभार ते सांभाळत होते. करोना काळात डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. पिंपळे हे चांगल्या कारभाराबरोबरच प्रशासनावर वचक निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

२६ मार्च रोजी सकाळी पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना डहाणू व्हेस्टकोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने तसेच डायलेसिस करण्यासाठी सोमवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले.पालघर तालुक्यातील मासवण या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here