लवकरच वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्याचे सरकारी आदेश

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे आता राज्य सरकार सतर्क झाले असून, गर्दी कमी कशी करता येईल, याची चाचपणी राज्य सरकार करत आहे. त्यात वर्क फ्रॉम होमवर भर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्क फ्रॉम होम बंधनकारक करावे यासाठी राज्य सरकार खाजगी कंपन्यांना आदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे ठरणारे नाही. यातून जर मार्ग काढायचा असेल, तर ज्यांना शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करुन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. यामध्ये आयटी कंपन्या तसेच इतर ऑफिसचा समावेश असणार आहे. याच दृष्टीकोनातून राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. वर्क फ्रॉम होम केले तर बरेच जण घरुनच काम करतील आणि ट्रेन, बस आणि मेट्रोची गर्दी कमी होऊ शकते. याचमुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करुन गर्दीवर आळा घालण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

सध्या राज्य सरकारकडून रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री आठ नंतर सर्व दुकाने, मॉल्स आणि हॉटेल्स बंद करण्यात येत आहेत. पण तरीसुद्धा रुग्णसंख्या ही वाढताना दिसत आहे. खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामावर हजर राहत असल्याने, ट्रेन आणि बसमधील गर्दी वाढत आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आणि त्यासाठीच वर्क फ्रॉम होमचा पर्याय लागू करुन पुन्हा एकदा ही वाढत असलेली संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here