नाशिक जिल्हा न्यायालयाच्या रेकॉर्डरुमला आग

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील जिल्हा न्यायालयातील रेकॉर्ड रूममध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलास पाचारण केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सीबीएस येथील न्यायालयाच्या आवारातील रेकॉर्ड रूमला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्र रूप घेतले. परिसरात धूर पसरल्याने घबराट झाली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here