अलवर (राजस्थान) – केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय.
अलवरच्या हरसौरा भागातील एका सभेला संबोधित केल्यानंतर राकेश टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्याचवेळी ततारपूर भागात त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तसंच काही अज्ञातांनी राकेश टिकैत यांच्या अंगावर शाई फेकली.
राजस्थान के अलवर जिले के ततारपुर चौराहा, बानसूर रोड़ पर भाजपा के गुंडों द्वारा जानलेवा पर हमला किए गए, लोकतंत्र के हत्या की तस्वीरें pic.twitter.com/aBN9ej7AXS
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) April 2, 2021
मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि राकेश टिकैत यांच्या सुरक्षित बाहेर काढलं. पोलीस सुरक्षेतच टिकैत यांना बानसूरला पोहचवण्यात आलं. हा हल्ला भाजपच्या गुंडांकडून करण्यात आल्याचा दावा, राकेश टिकैत यांनी केलाय. ही लोकशाहीच्या हत्येचा प्रयत्न असल्याचंही टिकैत यांनी म्हटलंय. बानसूर भागातही राकेश टिकैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले. शेतकरी नेत्यांनी ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’ असं म्हणत हा हल्ला भाजपकडून करण्यात आल्याचा आरोप केलाय.






