मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – राज्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढण्याच्या परिस्थितीबाबाबत आणि लॉकडाऊन करावा कि करू नये याबाबत मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता लाईव्ह येणार आहेत. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊनला मात्र सर्वस्तरांतून विरोध होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच भाजप या पक्षांचाही विरोध कायम आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
असा असू शकतो मिनी लॉकडाऊन
सध्या राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत करण्याचा विचार आहे. या वेळेतच दुकाने, हॉटेल, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
एकाच परिसरातील / विभागातील दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा विचार. एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकाने एका दिवशी सुरू राहतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील सुरू असतील.
सर्वात जास्त फूट फॉल म्हणजेच गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता आहे. संकर्मनाचे केंद्र असलेल्या या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.






