मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यातील सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोविड व्हॅक्सिन द्यावे, कोविड-19ने राज्यातील ज्या 72 पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांनी किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 5 एप्रिल 2021 रोजी ‘ई-मेल पाठवा आंदोलन’ करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
आपल्या मागण्यांसाठी राज्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, माहिती जनसंपर्क राज्यमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक यांना 500 मेल पाठविण्यात येणार आहेत. तसेच आपल्या तालुक्याचे आमदार आणि जिल्हय़ाचे पालकमंत्री यांनाही हे मेल पाठविण्यात येणार आहेत.






