कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि बेड, रक्त व ऑक्सिजनचा तुटवडा

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनाकरित्या वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामानाने रुग्णालयातील बेड्स, रक्तपुरवठा, आणि ऑक्सिजन याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत कोरोनाशी दोन हात कसे करायचे असा गहन प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा लाकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लीरॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता लॉकडाऊनचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here