मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाचा वाढत धोका काळ स्पस्ट करूनही अद्याप लोकलला आधीसारखीच गर्दी असल्याचे दिसून येते. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवून दिल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू करून कर्मचारी उपस्थितीवर निर्बंध लावणे गरजेचे आहे. असे असूनही लोकलला आधीसारखीच गर्दी होत असून लोकल भरभरून जात आहेत, असेच चालू राहिल्यास कोरोना आटोक्यात कसा येणार, असा प्रश्न सरकारला पडला आहे. म्हणून बुलंद पोलीस टाईम्सतर्फे असे आवाहन करण्यात येत आहे कि, मास्क लावा, सोशिअल डिस्टनसिंगचे पालन करा आणि अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडा.






