मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आणि उपाययोजनांवर मुख्यमंत्रीचें लाईव्ह भाषण काळ सुरु असतानाच बुलडाण्यात शेकडो भाविकांच्या गर्दीत सैलानी यात्रा सुरु होती.
विशेष म्हणजे एक आठवड्याआधी या सैलानी यात्रेला अनुमती नाकारण्यात आली होती. पोलिसांचा विशेष बंदोबस्त असतानादेखील शेकडो भाविक दर्ग्यात गोळा झाले होते. रात्री ८ ते ११ या वेळेत हि गर्दी कायम होती. संदल कार्यक्रमाला फक्त १० लोकांनाच परवानगी दिली गेली होती. मात्र तरीही शेकडो लोक गोळा झाले होते आणि पोलीस प्रशासनही यावर काहीही करू शकले नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास असे कार्यक्रम कारणीभूत होतात हे मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात बोलले होते तरीही लोकांनी किंवा तेथील प्रशासनाने यावर गांभीर्याने पावले उचलली नाहीत, हे खेदजनक आहे. आणि बुलडाण्यात ६ हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत, बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही… अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.






