वेरूळ आरोग्य केंद्रात मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात महामार्ग पोलिसांतर्फे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मृत्युंजय दुतांना कशा पद्धतीने मदत करायची, त्यांना कशा पद्धतीने हाताळायचे, गोल्डन अवर मध्ये कशा प्रकारे मदत करायची या विषयी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रम ति अकरा मृत्युंजय दुतांनी आपला सहभाग नोंदवला होता.

राज्याचे अप्पर पोलीस म हासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस, पुणे. प्रीतमकुमार यावलकर, महामार्ग पोलीस पुणे संजय जाधव तसेच श्रीमती नंदीनी चांपुरकर औरंगाबाद विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी वैद्यकिय अधिकारी डॉ. बलराज पांडव यांच्या अधिपत्याखाली डॉ.भाग्यश्री शेळके, डॉ. श्रीकांत तुपे यांनी उपस्थित ११ मृत्युंजय दूतांना अपघातग्रस्त व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करायची? त्यांना कशा पद्धतीने हाताळायचे? गोल्डन अवर मध्ये कशा प्रकारे मदत करायची याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले. दरम्यान, प्रत्येक मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉस्पीटल, रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले.khultabd-medical-training

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here