खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद पोलीसांनी दि. 3/4/2021 रोजी सायंकाळी अवैध देशी दारूच्या अड्यावर दोन ठिकाणी छापे मारुन 6000/- रुपये किमतीची दारु जप्त करुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी व रविवार असे दोन दिवस अंशतः लॉकडाउन असल्याने दोन दिवस शासन मान्य देशी दारू बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक चढ्या भावाने देशी दारूची अवैध विक्री करत आहे अशी माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन सुलीभंजन ता खुलताबाद येथे रेखा सुभाष हिवाळे यांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी देशी दारूच्या 22 बाटल्या मिळुन आल्या तर दुस-या छाप्यात मावसाळा ता खुलताबाद येथील सिताराम भिवसन सोनवणे यांच्या राहते घरा समोर छापा मारला असता त्या ठिकाणी 38 देशी दारूच्या बाटल्या आरोपीच्या ताब्यातून मिळुन आल्या. असा एकुण 6000/- रुपयांचा माल मिळुन आल्याने जप्त करुन २ आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार जाकेर शेख, संतोष भालेराव, प्रियंका गायकवाड, होमगार्ड/पटेल, तुपे यांनी केली.






