माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णी यांचे निधन

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णी यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुहास कुलकर्णी यांचे कुटुंब टेबल टेनिस या खेळासाठी ओळखले जात असे. निवृत्तीनंतर सुहास कुलकर्णी यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. ते या खेळाशी कायम जोडलेले राहिले. तसेच त्यांनी सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेतही सहभाग घेतला हे विशेष. 2019 सालामध्ये इंदूर येथे झालेल्या मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत त्यांनी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here