आटपाडी (प्रतिनिधी) – माणगंगा उद्योग समुहाचे प्रणेते, पाणी संघर्ष चळवळीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आनंदराव बापू पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनाने दुःखी झालेल्या पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतराव पाटील यांनी भेट देवून सर्वाचे सांत्वन केले.
आनंदरावबापु पाटील यांच्या मातोश्री शेवंताबाई गणपती पाटील यांचे मंगळवार दि . ३० रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर महोदयांनी आनंदराव बापूंच्या निवासस्थानी भेट देवून पाटील परिवाराचे सांत्वन केले . खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलराव बाबर, आमदार अरुणआण्णा लाड, जत चे माजी आमदार विलासराव जगताप , जि . प ‘ चे माजी सभापती आकाराम मासाळ , आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख इत्यादी मान्यवर महोदयांनी मागील काही दिवसात भेट देत परिवाराचे सांत्वन करून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहीली.

आज सायंकाळी मंत्री जयंतराव पाटील यांनी मातोश्री शेवंताबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली . आनंदराव बापु पाटील , शहाजीदादा पाटील, अशोकराव पाटील सर, प्रा तानाजीराव पाटील, महात्माजी पाटील या भावडांचे सांत्वन केले . यावेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक , राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील ,खानापूर आटपाडी मतदार संघ राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुशांत देवकर, ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील , राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, ज्येष्ट नेते कल्लाप्पा आण्णा कुटे ,राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव प्रा .एन .पी खरजे, प्रदेश युवक चे चिटणीस राजू जानकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रयभाऊ यमगर आटपाडी तालुक्याचे युवा नेते अनिलशेठ पाटील,राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील , शहर अध्यक्ष सभाजीराव पाटील , राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे , माजी उपसरपंच विलासराव नांगरे, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड ,दिघंचीचे मनोजबाबा भोसले, समाधान भोसले, प्रशांत गवळी, बनपुरीचे तात्यासाहेब बुरुंगले ,खरसुंडीचे राष्ट्रवादीचे नेते विजयराव पुजारी , शहर अध्यक्ष लालासाहेब भिसे इत्पादी मान्यवर उपस्थित होते.






