सादिक खाटीक यांचे आमदार अरुणआण्णां लाड यांना साकडे.
आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडीकर पुर्वजांना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कुंडल महालाच्या ठिकाणी नेतृत्व कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली . तथापि तुमच्या परिवाराची नाळच आटपाडीचा वसा – वारसा सांगणारी आहे, म्हणूनच पूर्वजांच्या आटपाडीवर कुंडल सारखेच प्रेम करा असे साकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी आमदार अरुण आण्णा लाड यांना घातले .आमदार अरुणआण्णा लाड यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलेल्या खास पत्राद्वारे सादिक खाटीक यांनी ही मागणी केली .
देशाला स्वातंत्र मिळावे म्हणून ब्रिटीशांच्या मस्तवाल सत्तेविरुद्ध लढलेले प्रति सरकारचे प्रमुख क्रांतीसिह नाना पाटील यांच्या नेतृत्वा खालील अनेक स्वातंत्र्य सैनिकांना भूमिगत होण्यासाठी आश्रय देत आटपाडीकरांनी मोठी भूमिका बजावल्याचा इतिहास असल्याचे सांगून सादिक खाटीक यांनी या पत्रात, क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी.डी . बापू लाड, देशभक्त रत्नाप्पाआण्णा कुंभार, भाई माधवराव बागल यांच्या सारखे अनेक दिग्गज स्वातंत्र्ययोद्धे आटपाडीत भूमिगत अवस्थेत वास्तव्यास होते . या मातृभूमीच्या वीरांना सुखरूप जपण्याचे काम तत्कालीन आटपाडीकर देशप्रेमींनी केले होते . हा अभिमानास्पद इतिहास लक्षात घेत आपल्या पुर्वजांच्या आटपाडीला कुंडल सारखेच प्रेम आणि नेतृत्व द्यावे.
विधानसभेच्या एकुण १५ निवडणुकात फ़क्त दोन वेळा आटपाडीचे मान्यवर आमदार झाले . या अन्यायावर आपल्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात अप्रत्यक्षरित्या आटपाडीचे प्रतिनिधीत्व करून फुंकर घालावी . इथल्या शेकडो महत्वपूर्ण प्रश्नांवर विधी मंडळाच्या पातळीवर आवाज उठवून आटपाडीची राजकीय परवड थांबवावी अशीही अपेक्षा सादिक खाटीक यांनी केली.
गुहागर – कराड – विटा – आटपाडी – पंढरपूर असा एक रेल्वे मार्ग आणि दुसरा आटपाडी मार्गे बारामती – विजयपूर (विजापूर ) हे दोन रेल्वे मार्ग अस्तित्वात आणणे , थोर साहित्यीकांची प्रलंबीत स्मारकांचा प्रश्न ,स्वतंत्रपुर कैद्यांच्या खुल्या वसाहतीत लहान गुन्हेगारांवर संस्कार करणारे बोस्टन स्कुल च्या धर्तीवर संस्कार केंद्राचा नवीन विभाग सुरु करण्याबरोबर , येथेच महिला गुन्हेगारांचे नवीन कारागृह उभारले जावे , जवळील डबई कुरण परिसरात पक्षी अभयारण्या बरोबरच चिंचबन आणि ऑक्सीजन पार्क उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा . ऐंशी ते नव्वद मीटर रुंदीच्या आटपाडीच्या दोन्ही विस्तीर्ण ओढापात्रात होत असलेली अतिक्रमणे काढणे, देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमीनीवर उभारली गेलेली अतिकमणे, शासनाच्या जागेवर बोगस खरेदी पत्राच्या द्वारे कब्जा केलेले भुखंड मोकळे करणे, राजेवाडी तलाव ते बुद्धीहाळ तलाव दरम्यान अनेक तलाव जोडत तलावजोड योजना अस्तित्वात आणणे . आटपाडी तालुक्यातील उष्णतेची घनता राजस्थानातील सर्वोच्च उष्णतेची घनता असणाऱ्या ठिकाणाशी साधर्म्य साधणारी असल्याने या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सौर उर्जा प्रकल्प साकारण्यासाठी पुढाकारा घ्यावा, सर्वच फळांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी आणि संशोधन केंद्र साकारण्या बरोबरच माणदेशी शेळ्या मेंढ्याचे मांस परदेशी पाठविणारी यंत्रणा येथे साकारण्या साठी तसेच यासारख्या आटपाडी तालुक्यातील शेकडो महत्वपूर्ण प्रश्नांची उकल होण्यासाठी अरुणआण्णांनी आमदारकी उपयोगात आणावी अशी ही अपेक्षा शेवटी सादिक खाटीक यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.






