कोरोनाचा सामना करण्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार नर्सेस उपलब्ध करून देणार – अमित देशमुख

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वत्र चिंतेचा विषय ठरत आहे. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्यसेविकांचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून राज्यमंत्री अमित देशमुख यांनी ५ हजार वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार आरोग्यसेविकांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे.

२० एप्रिलला वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून हे विद्यार्थी इंटर्नशिपसाठी मिळवून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी हे डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील नर्सिंग अभ्यासक्रमातील इंटर्नशिप पूर्ण केलेल्या १५ हजार नर्सेसही तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या नर्सेस सेवा तातडीने त्या त्या राज्यात उपलब्ध करिन देण्यात येतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here