आता राज्यात ‘ ब्रेक दी चेन ‘ मिशन ऑन

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता कंबर कसली आहे. आता राज्यात ‘ मिशन बिगिन अगेन’ नाहीतर ‘ब्रेक दी चेन’ सुरु होणार आहे. पाहुयात हे मिशन ‘ ब्रेक दी चेन’ नक्की काय आहे…….?

राज्यात कोरोनाचा विस्फोट होत असल्याकारणाने रविवारी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली गेली होती, ज्यात संपूर्ण राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला . राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर आणण्यासाठी काम सुरु केलं होतं. सर्वकाही पूर्वपदावर येत असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकेत येऊ लागले आहेत. मिशन बिगीन अगेन ऐवजी आता राज्यात ‘ब्रेक दी चेन’च्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार काम करत आहे. आता दिवस जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे.

नागरिक म्हणून आपले सुद्धा कर्तव्य असून सरकारकडून आलेल्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करून ‘ ब्रेक दी चेन’ यामध्ये सरकारला मदत केली पाहिजे. आम्ही बुलंद पोलीस टाइम्स सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत कि, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टंसिन्ग चे पालन करा आणि मुख्य म्हणजे गर्दी करणे टाळा. अशाच अनेक अपडेट्स साठी बुलंद पोलीस टाइम्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here