मालेगाव (प्रतिनिधी आकाश सावंत) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर महाराष्ट्रभर पसरला आहे परंतु लोकांना मात्र या विषयाचे गांभीर्यच नसल्याचे मालेगावात समोर आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपासून सर्व नेते मंडळी, सामाजिक संस्था, डॉक्टर्स कोरोना नियमांचे पालन करा म्हणून घसा कोरडा करत असतांना नागरिक मात्र त्यांच्या या आवाहनाला हरताळ फासतांना दिसत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इतर सर्व नियमांबरोबरच सामाजिक स्थानांवर एकमेकांपासून ठरावी अंतरावर किंवा दूर राहणे गरजेचे आहे… एकमेकांच्या संपर्कात आलोच नाही तर कोरोनापासून आपला बचाव होण्याची शक्यता कित्येत पटींनी वाढते. पण मालेगावातहा हा व्हिडिओ पाहा…
दारुच्या खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या गर्दीत कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता किती जास्त आहे हे वेगळं सांगायला नको. पण अशा गोष्टी प्रशासनाने किंवा कोणी सांगून कशा समजणार. जोवर समाजातील प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखणार नाही, तोवर हे असे काहीतरी दिसतच राहणार.
हा प्रकार समोर आल्यानंतर महानगर पालिकेने या दुकानदारावर कारवाई करत त्याला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडून कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात आहे की नाही, याची काळजी दुकानदारानं घेणंही गरजेचं आहे.






