मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाचे रुग्ण देशभरात सर्वत्र वाढत आहेत. केंद्र सरकारतर्फे कोरोना पाहणीसाठी ५० पथके तैनात करण्यात आली असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात चिंतेची बाब म्हणजे ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना संख्या जास्त असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ७ महाराष्ट्रातील आहेत. एक जिल्हा कर्नाटकातील आहे तर आणखी २ जिल्हे छत्तीसगढ आणि दिल्लीतील आहेत.






