मुंबई (संदेश काटकर) – राज्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी लागू केली गेली आहे तरीही पुण्यात जनता काटेकोर पालन करताना दिसत नाही. म्हणून पोलिसांनी दिवसही रस्ते बंद करून जनता रस्त्यावर येणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी व्यवस्था केली आहे. रस्त्याच्या मध्ये बॅरिकेड्स तसेच बांबू लावून रस्ते बंद करत अहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी चौकाचौकांत असे अडथळे निर्माण केल्यामुळे निशचितपणे वाहतुकीचा वेग काहूर मंदावेल अशी आशा पोलिसांना आहे.






