रेमडीसिवीर मिळणार 1300 रुपयांत, सर्वत्र समान दर होणार

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनचा दर ठरविण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर कमाल 1300 रुपयेपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी दिली.

रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या औषधाचे उत्पादन करणाऱया देशात एकूण 7 कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीची किंमत वेगळी आहे. काहींची कमाल किंमत साडेचार हजार असे आहे. औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे.

त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मी विभागाच्या अधिकाऱयांची नुकतीच बैठक घेतली. दोन दिवसांत यासंदर्भातले आदेश जारी होतील. कोरोना चाचणीचे दर राज्य सरकारने कमी केले आहेत. तसे रेमडीसिवर औषधाचे दर नक्की कमी होतील आणि राज्यातील कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री शिंगणे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here