कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता #दहावी आणि #बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा #रद्द कराव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ramdas-athvale

मुंबई (प्रतिनिधी दिनेश लोंढे ) – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे.दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या हजारोच्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्री ना वर्षाताई गायकवाड यांनी 1 ली ते 8 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे.त्या प्रमाणेच 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here