चैत्यभूमी येथील क्रांतिकारी माती दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील शहिदांच्या स्मारकासाठी रवाना!

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – ६ एप्रिल रोजी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ म्हणजे चैत्यभूमी येथे देशभरात सुरू असलेल्या ‘मिट्टी सत्याग्रहाला’ समर्थन देण्यासाठी म्हणजेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून विविध जिल्हा, राज्यातून, क्रांतिकारकांच्या गावातून – भूमीतून माती गोळा केली जात आहे व त्यातून शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या तीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या संघर्षशील स्मृतीस जागृत ठेवण्याकरिता एक ‘शेतकरी शहीद स्मारक’ निर्माण केले जाणार आहे.

त्या स्मारकास चैत्यभूमी येथील क्रांतिकारी माती जिथे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी झाला आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी प्रचंड कार्य केला आहे. अशा चैत्यभूमीची माती एका धड्यात गोळा करून ती दिल्लीला शेतकरी शहीद स्मारकासाठी पाठवण्यात आली.

यावेळी केंद्र सरकारच्या कृषी विरोधी व कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला गेला. सदर कार्यक्रमास जगदीश नगरकर, अमोल मडामे, मूलनिवासी माला, अॅड. शकील अहमद, प्रवीण दाभाडे, ऍड. रोहन कोरडे,स्नेहल कांबळे, सिद्धार्थ उगाडे, कॉ. मनोज यादव, अशोक कांबळे, अविनाश गायकवाड, अविनाश गरुड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here