मुंबईत (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडावून घोषित झाला आहे.पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगधंद्यांबरोबरच छोटे दुकानदार सलूनवाले यांचे अतोनात नुकसान झाले होते.
आता पुन्हा सर्व बंद करायला लागल्यामुळे सलूनवाल्यांचा धंदा बसणार आहे. आता कुठे गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा लॉकडावून पुकारल्याने सर्व सलूनवालेही नाराज झाले आहेत. आणि आता जर नियम शिथिल केले नाही तर जगणे मुश्किल होईल आणि आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,अस इशारा सलूनधारकांनी दिला आहे.






