मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – लॉकडाऊनच्या दिवशी काही विशिष्ट घटकांना प्रवास करण्यास मुभा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन गाइडलाईन्स जारी केल्या आहेत.
राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात रोज विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी सुरू केली आहे. तसेच शनिवारी, रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र हा लॉकडाऊन कसा असेल याची नियमावली मुंबई महानगरपालिकेने जारी केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला अथवा परीक्षेला जायचे असेल त्यांना हॉलतिकीट पाहून प्रवासास मुभा दिली जाईल. त्या विद्यार्थाबरोबर एका व्यक्तीला (पालक) प्रवासास मुभा दिली जाईल. अन्नपदार्थ आणि इतर महत्वाच्या गोष्ठीसाठी होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या जसे झोमॅटो तसेच स्वीगी याना २४ तास डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल बंद असतील तर त्यांना होम डिलिव्हरी करण्यास पूर्ण मुभा असेल.
वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशी रस्त्याशेजारी असलेल्या फळवाल्याना पार्सल सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र ग्राहकाला त्या दुकानासमोर उभे राहून खाण्यास परवानगी नाही. घरकाम करणाऱ्या महिला, स्वयंपाकी, तसेच ब्लॉक, घरकामात मदत करणारे लोक, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, ज्येष्ठांना सेवा पुरवणाऱ्या लोकांना सकाळी ७ ते १० या वेळेत परवानगी देण्यात आ ली आहे. डोळ्यांचे रुग्णालय, चष्म्याची दुकाने याना राज्य सरकारने नेमून दिलेल्या वेळेतच दुकाने उघडता येतील.






