मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाचा वाढत संसर्ग धोकादायक असलयाने दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. याचा अर्थ सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे असे नाही. गर्दी टाळण्यासाठी हे नियम घातले आहेत.
नियम पाळून सरकारला सहकार्य करावे. लॉकडाऊन किंवा निर्बंधाचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये, अशीच अपेक्षा आहे, .असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.






