मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रामुख्याने कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापरले जात असून या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे.
या इंजेक्शनसाठी औषधांच्या दुकानांबाहेर रांगाच्या रांगा लागताना पहायला मिळत आहे. केवळ एकट्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. प्रौढ रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. हे औषध अशा रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, नेमका याच औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.. त्यामुळे केंद्र सरकारने हे औषध निर्माण करणाऱ्या उत्पादकांना त्याचे उत्पादन पूर्ण क्षमतेने वाढवण्याचे आदेश दिले.






