केरळचे मुख्यमंत्री विजयन यांना करोनाबाधा

थिरूवनंतपूरम (केरळ) – मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांना करोनाबाधा झाल्याचे गुरूवारी समोर आले. विशेष म्हणजे, विजयन यांनी महिनाभरापूर्वी करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता.

करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: विजयन यांनी ट्विटरवरून दिली. ते उपचारासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल झाले. त्यांच्यात करोना संसर्गाची कुठली लक्षणे आढळली नव्हती.

डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिलला मतदान झाले. त्या निवडणुकीतील प्रचारासाठी विजयन राज्यभर फिरले. आता करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर विजयन यांनी मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणीला सामोरे आणि विलगीकरणात जाण्याचे आवाहन केले आहे. विजयन यांच्या कन्येला आणि जावयाला याआधी करोना संसर्ग झाला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here