कृष्णा हॉस्पिटलच्या नवीन रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट

सोलापूर (जिल्हाप्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील ढोकी रोड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नवीनच दाखल झालेल्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले आहे. गाडीमध्ये कुणी रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ही रुग्णवाहिका बार्शी येथून रुग्ण सोडून परत येत असताना कळंब शहरातील महावितरण कार्यालयासमोर आली असता गाडीच्या समोरील भागातून अचानक धूर निघत असल्याचे नागरीकांच्या लक्षात आले. त्यांनी चालकाच्या निदर्शनास आणून दिले व गाडी थांबवली. हे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने रुग्णवाहिका तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. या रुग्णवाहिकेचा थरार कळंब येथील महावितरण कार्यालयाच्या समोर दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला. या घटनेने या भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.रत्याच्या कडेला असलेल्या लोकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

ही घटना पोलिसांना समजताच पथक घटनास्थळी दाखल झाले. नगरपरिषदेच्या आग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी यश आले. रुग्णवाहिकेला नेमकी कशाने आग लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here