मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – भिनेता फरहान अख्तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. मार्व्हेल स्टुडिओझचा चित्रपट असून फरहान त्यासाठी बँकॉकला गेला असल्याची माहिती समोर येत आहे.
मार्व्हेल स्टुडिओ हा जगातील एक नावाजलेला फिल्म स्टुडिओ आहे आणि त्यामुळे फरहानचं या स्टुडिओसोबत काम करणं ही फार मोठी बातमी मानली जात आहे. अद्याप तरी फरहानने यावर काहीही भाष्य केलं नसलं तरीही फरहान हा शूटिंगसाठी रवाना झाला असल्याचं समजतं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान मार्व्हेल स्टुडिओजसोबत प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी इतर आंतरराष्ट्रीय कलाकार आणि क्रू मेंबर्स सोबत बँकॉकमध्ये आहे. पण या प्रोजेक्टविषयी आणखी काहीच गोष्टी उघड करण्यात आल्या नाहीत. र्वकाही गोपनीय ठेवण्यात आलं आहे.
मार्व्हेल स्टुडिओ हा अमेरिकन फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ आहे. या स्टुडिओजचे अनेक चित्रपट मालिका या जगभरात पाहिल्या जातात. तसंच जगभरात त्यांचे चाहते आहेत. तर आता फरहानचं नाव मार्व्हेल सोबत जोडलं जात असल्याने त्याचे चाहतेही भारावून गेले आहेत. तर या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी आता त्याचे चाहते उत्सुक आहेत.
फरहान बॉलिवूडमधील एक नावाजलेला अभिनेता आहे. अभिनसोबतच तो गायक, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकसुद्धा आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘तूफान’ हा फारच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहत आहे.






