सेव्हन हिल्स रुग्णालयामधील लसीकरण केंद्र बंद

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयामधील लसीकरण केंद्र बंद करण्यात आल आहे . लसीचा पुरेसा साठा नसल्याने हे लसीकरण केंद्र पुढील आदेश येईपर्यंत बंद केल्याचे सांगितलं आहे. मुंबईमध्ये लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने गुरुवारी २५ लसीकरण केंद्रे बंद पडली. तसेच लस उपलब्ध न झाल्यामुळे दोन दिवसांत उर्वरित लसीकरण केंद्रे बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत पालिकेच्या ३३, राज्य आणि केंद्र सरकारच्या १४ तसेच खासगी रुग्णालयातील ७१ केंद्रांवर लसीकरण केले जाते. त्यापैकी २५ केंद्रे बंद करण्यात आली आहेत. १५ एप्रिल रोजी लशींचा पुढचा साठा मिळणार असून तोपर्यंत लसीकरण थांबवावे लागणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र गुरुवारी दुपारपर्यंत लशीचे डोस उपलब्ध झाले नाहीत. मागील आठवड्यापासून कोव्हॅक्सिन लशीचा साठा अपुरा असल्याच्याही तक्रारी सातत्याने येत होत्या. खासगी रुग्णालयांमध्ये दुपारी लशी संपल्यामुळे अनेकांना परत जावे लागले. लशींची उपलब्धता झाली नाही तर सर्वसामान्यांच्या उत्साहावर पाणी फिरेल. त्यांना पुन्हा लसीकरणाकडे वळवणे अवघड होईल, याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी लक्ष वेधले.

“राज्यात काही ठिकाणी लस उपलब्ध नाही, म्हणून आम्हाला लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही राज्यात लसीची कमतरता असल्याची माहिती दिली आहे. केंद्राकडून लसांचा पुरवठा सुरू आहे पण “यात वेग नाही,” असे राजेश टोपे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here